.

About Us

नमस्कार मित्रानो! मराठीFB या मराठी ब्लॉग वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. चला जाणून घेऊया या ब्लॉग बद्दलची थोडक्यात माहिती. 

शुभेच्छा देणे भारतीय संस्कृतीची तशी जुनीच परंपरा. शुभेच्छांमुळे नाते संबंध दृढ होण्यास मदत होते. वाढदिवस असो किंवा एखादा सण, शुभेच्छा या दिल्याचं पाहिजेत. पूर्वीच्या काळी लोकांकडे भरपूर वेळ असायचा आणि ते एकमेकांना भेटून शुभेच्छा द्यायचे.  


पण आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ काढणे सर्वांनाच शक्य होत नाही त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा सणावाराच्या शुभेच्छा या मोबाईल वरच पाठविल्या जातात आणि म्हणून या शुभेच्छांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.  तसा विचार केला तर इंटरनेटवर हिंदी आणि इंग्लिश शुभेच्छा संदेशांची कमी नाही.  कमी आहे ती अस्सल मराठी संदेशांची आणि हाच विचार करून आम्ही हा ब्लॉग बनविण्याचा निर्णय घेतला. 


 या ब्लॉग वर तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रत्येक मराठी सणाच्या शुभेच्छा,  मुलगा किंवा मुलगी झाल्याच्या शुभेच्छा, लग्नाच्या शुभेच्छा, नोकरीत प्रमोशन च्या शुभेच्छा,  मराठी उखाणे, मराठी  कविता, स्फूर्तीदायक मराठी विचार, प्रेमाचे स्टेटस, दुःखाचे स्टेटस, तुमच्या मोबाईल साठी सर्व प्रकारचे मराठी व्हाट्सअप स्टेटस असे एक ना अनेक विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  


आमचे हे विचार आपल्याला आवडले असतील तर आपण आम्हाला ते नक्की कळवू  शकता त्यासाठी आपण आम्हाला आमच्या कॉन्टॅक्ट अस  विभागातून मधून संपर्क करू शकता किंवा आमच्या मेल आयडी वर आपण आपले विचार किंवा सूचना आम्हाला कळवू शकता आम्ही त्या सूचनांचा नक्की विचार करू.  आपण आपले विचार कमेंट च्या माध्यमातून सुद्धा आमच्या पर्यंत पोहोचवू  शकता.  तर अशाच नवनवीन शुभेच्छा संदेश आणि साठी किंवा स्फूर्तीदायक विचारांसाठी मराठी FB ला नियमित भेट द्या.


आता या ब्लॉग विषयी थोडक्यात,

ब्लॉग ची सुरुवात - २०२० (Corona lockdown च्या काळात.  त्या मुळे आम्ही याला lockdown Edition म्हणतो.)

आमचा पत्ता - पुणे, महाराष्ट्र, भारत. 

संपर्कासाठी ई-मेल - marathibf.com@gmail.com 

Post a Comment

Post a Comment (0)