.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marriage anniversary wishes in Marathi | Wedding anniversary wishes in Marathi


Wedding Anniversary Wishes in Marathi


लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा संदेश | Wedding anniversary wishes in Marathi

लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असतो कारण हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारा असतो. विवाह बंधनात अडकल्यानंतर पोरकटपणा  कमी होऊन जबाबदारीची जाणीव होऊ लागते. 


लग्नाआधी जास्तीत जास्त वेळ बाहेर घालवणारी मुले लग्नानंतर जास्तीत जास्त वेळ आपल्या जोडीदाराला देऊ लागतात. लग्नानंतरच खऱ्या अर्थाने आयुष्याची सुरुवात होते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. लग्नानंतर प्रत्येक जण आपल्या जोडीदाराबरोबर नवीन जीवनाची सुरुवात करतो असा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असतो. 


लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करायचा याचं  नियोजन खूप आधी पासून केलं  जातं. आणि जसा जसा हा दिवस जवळ येईल, तसा  तसा  उत्साह आणखी वाढत जातो. लग्नाच्या दिवशी मनामध्ये खूप आठवणी साठवलेल्या असतात. लग्नाच्या वाढदिवशी अश्या आठवणींना उजाळा मिळतो. 


आजच्या धकाधकि च्या जीवनात एकमेकांना पुरेसा वेळ न देऊ शकणारे या दिवशी आपल्या जोडीदाराला आवर्जून  वेळ देतात किंबहुना ते पूर्ण दिवस आपल्या जोडीदाराबरोबर घालवणे पसंत करतात. या दिवशी कुठेतरी बाहेर फिरायला जायचे नियोजन केले जाते. 


बाहेर जाणे जमले नाही तर घरातच लग्नाचा वाढदिवस साजरा केला जातो. हा दिवस जोडप्यासाठी खूपच आनंदाचा असा असतो.  अशा या पवित्र दिवशी म्हणजेच लग्नाच्या वाढदिवसा दिवशी जर आपण कोणाला शुभेच्छा दिल्या तर त्यांचा आनंद द्विगुणित होतो.   


आपल्या मित्रमंडळींना पैकी किंवा नातेवाईकांपैकी जर कोणाचा लग्नाचा वाढदिवस जवळ आला असेल तर आपण त्यांना नक्की शुभेच्छा द्या आणि त्यांच्या मनात स्थान मिळवा. आता हे लग्नाच्या वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश मिळवायचे तरी कोठून? चिंता नको, त्या साठी मराठीFB आहे. 


मराठीFB  या ब्लॉग ला  नक्की भेट द्या.  या साईटवर आपल्याला लग्नाच्या वाढदिवसा करिता नवीन नवीन शुभेच्छा संदेश मिळतील.  तर मग विचार कसला करताय? आपल्या जवळच्या जिवलगांना लवकरात लवकर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा. 


Marriage anniversary wishes in Marathi

Marriage anniversary wishes in Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy marriage anniversary wishes in Marathi

Happy marriage anniversary wishes in Marathi

नाश होऊ दे दुःखाचा, संसार होऊ दे सुखाचा,
एक मेका साथ द्या, कायम प्रेमाचा हात द्या,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व आकांक्षा आणि इच्छा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Wedding anniversary wishes to wife from husband in Marathi


रेशमी साडीला जरीचा किनारा,
प्रेमाच्या नात्याला जोडीदाराचा सहारा,
बहरू दे प्रेम आणि फुलुदे संसार,
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अपार.
Wedding anniversary wishes to husband


साता जन्माचे नाते आपले,
प्रेम रुसव्यांनी आजवर जपले,
पण आजचा दिवस आहे जरा जास्तच खास,
लग्नाचा वाढदिवस म्हणजे प्रेमाची आस.
Marriage anniversary wishes to wife in Marathi

Marriage anniversary wishes to wife in Marathi

तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे,
तुझ्याशिवाय हे जगणे सुद्धा व्यर्थ आहे,
जीवनातल्या प्रत्येक क्षणी तुझी अशीच साथ राहू दे,
आज लग्नाच्या वाढदिवसादिवशी तुझा हात माझ्या हातात राहू दे.
Wedding anniversary wishes for wife in Marathi


याच दिवशी अडकलो होतो प्रीतीच्या बंधनात,
आठवतं का गं सखे तुला, तुझ्याच घराच्या अंगणात,
वर्षां मागू वर्ष गेली पण, सुरळीत आहे संसार,
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अपार.
Wedding anniversary wishes from husband to wife in Marathi


एक मेकांच्या साथीने, नेटाने संसार रेटला,
धीर तुझ्याकडून मला, आणि माझ्याकडून तुला भेटला,
बायको मिळाली तुझ्यासारखी, आजही कौतुक आहे मला,
बोल, लग्नाच्या वाढदिवसाच्या काय शुभेच्छा देऊ तुला?
Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post