.

वधु साठी चटकदार मराठी उखाणे अगदी नवीन | Marathi ukhane for female | Marathi ukhane for bride | Marathi ukhae for Girl

 

Marathi ukhane for female


उखाणे म्हणजे काय? | What is the Marathi Ukhane?

उखाणे(Marathi Ukhane), म्हणजेच नाव घेणे, हि महाराष्ट्रातील काही जुन्या परंपरांपैकी एक. उखाणे हि मराठी परंपरेला मिळालेली एक अमूल्य देणगीच आहे. लग्नामध्ये प्रत्येक वधू वराने आपल्या आपलया  जोडीदाराचे नाव घेतलेच पाहिजे त्याशिवाय लग्न सोहळा पूर्ण होतच नाही (marathi ukhane for marriage).

आताच्या नवीन पिढीत स्त्रिया पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात.  शहरांमध्ये तर बऱ्याच स्त्रिया आपल्या जोडीदाराला नावानेच हाक मारतात आणि त्यात प्रेम विवाह असेल तर विचारायलाच नको. 
पण पूर्वीच्या काळी अशी पद्धत न्हवती. पूर्वी स्त्रीने पुरुष्याला नावाने हाक मारणे निषिद्ध मानले जायचे. मग पत्नीने पतीचे नाव घ्यायचे तरी कधी? तर त्या साठी सुरु झाली उखाण्यांची पद्धत. 

उखाण्यांमध्ये पतीचे किंवा पत्नीचे नाव एक विशिष्ठ प्रकारे  यमक जुळणी करून त्यात गुंफून घेतले जाते आणि या मध्ये जुन्या कुठल्याही परम्परेचे उल्लंघन पण होत नाही. असे उखाणे ऐकणे हि एक पर्वणीच असते. उखाणे घेताना वधूचे लाजणे किंवा वरच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे असतात. महिला वर्गामध्ये तर हे उखाणे खूपच लोकप्रिय आहेत. 

ज्यांचा लग्न ठरले आहे त्यांनी सर्वात प्रथम चांगले उखाणे शोधून पाठ करून ठेवावेत(Navriche Ukhane)  म्हणजे नंतर पंचाईत नको कारण लग्न नंतरही बऱ्याच समारंभात हि उखाणे घ्यावे लागतात. (Marathi ukhane for female)
पण बरेच जण जे उखाणे घेतात ते  वर्षानुवर्षे बऱ्याच जणांनी घेतलेले असतात आणि ते अगदी घासून घासून गुळगुळीत झालेले असतात. जर उखाणा आधी बऱ्याच वेळा ऐकला असेल तर त्यात ती गम्मत राहत नाही जी नवीन आणि न ऐकलेल्या उखाण्यात असते. जर उदाहरण द्यायचे झाले तर भाजीत भाजी मेथीची, _ _ _ माझ्या प्रीतीची.

 हा उखाणा जर ऐकला तर उखाणे घेणाऱ्याच्या जुन्या मानसिकतेचा अंदाज येतो आणि त्या व्यक्ती कडून नवीन काहीतरी ऐकायला मिळेल हि अपेक्षा सुद्धा राहत नाही. म्हणून उखाणे निवडताना अगदी नवीन आणि पूर्वी कधीही न ऐकलेले असे निवडले पाहिजेत जेणे करून उखाणे घेण्याऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघाना समाधान मिळाले पाहिजे.(Marathi ukhane for bride) तर असे नवीन दमाचे उखाणे मिळणार तरी कोठे? चिंता नको. त्यासाठी मराठी FB आहे ना.(Modern Marathi ukhane for female) 

उखाणे घेण्यासाठी एक खास वातावरणाची गरज असते. म्हणजे हळदी, लग्न, गृहप्रवेश इत्यादी.(Haldi kunku ukhane) आणि अशा प्रसंगी तरुणांप्रमाणेच अबाल वृद्धांचे कान सुद्धा उखाणे ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात. नवरदेव किंवा नवरी भोवती मित्र मंडळींचा गराडा असतो. आणि मग कोणता उखाणा घ्यायचा, हा नको तो, असे सल्ले दिले जातात. चांगला उखाणा निडरपणे घेतल्यावर व्यक्तिमत्व पण प्रभावशाली वाटते. 

काहीजण मजेदार उखाणे (Ukhane marathi funny | comedy ukhane) घेऊन जमलेल्या मंडळींना पोट  धरून हसायला लावतात.
प्रत्यकाने कमीत कमी ४ - ५ तरी उखाणे जरूर पाठ करून ठेवावेत जेणे करून आपण आपल्या मित्र किंवा मैत्रिणींना ते त्यांच्या लग्न किंवा इतर समारंभावेळी सुचवू  शकता. चला तर पाहूया नवरीसाठी खास उखाणे फक्त मराठी FB वर. 
Marathi ukhane for female

Marathi ukhane for female

सासर माझं श्रीमंत, आहे खूप सारा पैका,
_ _ _ रावांच नाव घेते, सारे जण ऐका.

Marathi ukhane for female funny

Marathi ukhane for female funny

चांदीच्या ताटात फणसाचे गरे,
चांदीच्या ताटात फणसाचे गरे,
_ _ _ राव दिसतात बरे,
पण माझं ऐकतील तेव्हा खरे.
Modern Marathi ukhane for female

Modern Marathi ukhane for female

आधी साखरपुडा, मग हळदी, मग झाले लग्न,
आता _ _ _ रावांच्या संसारात होईन मी मग्न.
Ukhane in Marathi for female marriage


जमल्या साऱ्या मैत्रिणी,आले मामा आणि मावशी,
_ _ _ रावांच नाव घेते, आजच्या पवित्र दिवशी.
Navriche ukhane


हातात बांगड्या, नाकात नथ,
_ _ _ रावांमुळे, वाढली माझी पत.
Ukhane Marathi for female


शालू आहे भरजरी, पण मेकअप आहे साधा,
_ _ _ राव माझे कृष्ण, आणि मी त्यांची राधा.
Latest marathi ukhane for bride


अयोध्ये सारखे सासर, आणि गोकुळासारखे माहेर,
_ _ _ रावच माझ्यासाठी, सर्वात मोठा आहेर.
Marathi ukhane female


गळ्यातल्या मंगळसूत्रात, सांगा मणी आहेत किती?
_ _ _ राव आहेत सोबत, मग मला कसली भीती.
Navriche ukhane


रात्र झाली खूप, अंधार पडलाय फार,
_ _ _ रावांसोबत उचलीन, मी संसाराचा भार.
Marathi ukhane bride


माहेरचा झाला कमी, आणि वाढला सासरचा ओढा,
_ _ _ राव आणि माझा, लक्ष्मी नारायणाचा जोडा.
Marathi ukhane girl


बघता बघता सासर आले , सरली माहेरची वाट,
_ _ _ रावांसोबत बांधली, मी आयुष्याची गाठ.
Ukhane Marathi funny


_ _ _ राव गेले ऑफिसात, करमेना मला घरात,
मग काय, लावला लग्नाचा विडिओ आणि पाहत बसले वरात.
Navri sathi ukhane


संपत आला हिवाळा, लागली उन्हाळ्याची चाहूल,
_ _ _ रावांच्या घरात, आता टाकते पहिले पाऊल.
Ukhane in Marathi for female


तांब्याचा हंडा, त्यावर पितळेची परात,
_ _ _ रावांच नाव घेते, आता त्यांच्याच घरात.
Marathi ukhane for female


सासू सासरे प्रेमळ आणि नवरा सुद्धा हौशी,
_ _ _ रावांसाठी प्रार्थना करते, आता प्रत्येक दिवशी.
Navryamulisathi marathi ukhane


_ _ _ माझे माहेर, आणि सासर आहे पुणे,
_ _ _ राव आहेत सोबत, मग आता कसले उणे.
Navin Marathi ukhane


देवा ब्राह्मणांच्या साक्षीने, घेतला नवीन वसा,
आता _ _ _ रावांच्या जोडीने, बघा संसार करते कसा.
Latest Marathi ukhane


नाव घेते आता, सर्वानी शांत बसा,
_ _ _ रावांच्या आयुष्यात, उमटवणार मी ठसा.
Latest marathi ukhane for female


सायंकाळची वेळ आणि वारा सुटला गार,
खुद्कन हसले गाली, जेव्हा _ _ _ रावांना घातला मी हार.
Marathi ukhane comedy


नाव घे, नाव घे म्हणून सर्वानीच केलय बेजार,
_ _ _ रावांचं नाव घेते, आता तरी शांत बसा यार.
ukhane marathi funny


शंकराच्या पिंडीवर, वाहिले बेलाचे पान,
_ _ _ रावांचं नाव घेते, धरून त्यांचाच कान.
Funny Marathi ukhane


गरम गरम तेलात तळला भजी आणि वडा,
_ _ _ रावांचं नाव घेते, भरून हिरवा चुडा.
comedy Marathi ukhane


मी शुद्ध शाकाहारी पण _ _ _ राव खातात मटण,
दारू पिऊन करतात भांडण, मग तुटते शर्टाचे बटण.
Vadhusathi Marathi ukhane


देवापुढे लावली अगरबत्ती, पसरला सगळीकडे सुगंध,
_ _ _ रावांचं नाव घेताच, झाले मी धुंद.
Latest Marathi comedy ukhane


जेवणं झाली, भांडी झाली आणि दरवाजा केला बंद,
पण माझे झालेत वांदे, कारण _ _ _ राव आहेत मंद.
Marathi ukhane for Marriage


पक्वानांनी भरलय ताट, वाढलेत लाडू पेढे,
_ _ _ रावांचं नाव घेते, आता नको आढे वेढे.
Marathi ukhane for bride


केले सोळा सोमवार, आणि शंकराची आरती,
_ _ _ राव आले आयुष्यात, आणि झाली इच्छापूर्ती.
Comedy ukhane for female


बघायला आलते मला तेव्हा स्वभाव वाटला भोळा,
पण _ _ _ राव आताच बजावते, माझ्या बहिणीवर नका ठेऊ डोळा.
majedar comedy funny Marathi ukhane


नेसली जरीची पैठणी आणि घेतला डोक्यावर पदर,
सगळा गाव लाईन मारतोय, पण _ _ _ रावांना नाही कदर.
Haldi kunku ukhane


पूर्व जन्मीची पुण्याई म्हणून लक्ष्मी आली दारी,
_ _ _ रावांसोबत करीन मी,महालक्ष्मी ची वारी.
Sankrantiche ukhane


गेले होते कोकणात, तिथून आणले काजू,
_ _ _ रावांचं नाव घ्यायला मी कशाला लाजू .
Haldu kunkvache ukhane


गेले होते मंदिरात, केलं भरपूर ध्यान,
नशिबाने पदरी टाकलं _ _ _ रावांचं दान.
funny ukhane marathi


गेले होते फिरायला, दुखू लागले पाय,
_ _ _ राव दिसतात कमजोर, पण नाद करायचा नाय.
Comedy Marathi ukhane


नणंदेचं कार्ट, बसलं कोपऱ्यात रुसून,
_ _ _ रावांचं नाव घेते, पदराआड हसून.
Majedar funny Marathi ukhane


रस्त्याने चालली होती लग्नाची वरात,
बघायला गेले दारात, पण चुकून _ _ _ रावांना कोंडलं घरात.
Marathi comedy ukhane joke


दुखत होती पाठ, म्हणून बसले होते टेकून,
चकणा संपला म्हणून, _ _ _ रावांनी प्लेट मारली फेकून.
Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post